काँग्रेस नेत्यांनी पुतळ्यासमोर प्रायश्चित्त करावे: राधाकृष्ण विखे पाटील
Breaking News | Ahilyanagar: आत्मक्लेश करणाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आता प्रायश्चित्त करावे.

श्रीरामपूर : राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचा निषेध व्यक्त करीत आत्मक्लेश करणाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आता प्रायश्चित्त करावे, असा सल्ला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. पालिकेसमोर शिवसेना ठाकरे
गटाच्या सचिन बडधे यांनी आत्मक्लेश आंदोलन केले होते. पुतळ्याची जागा बदलण्यात आली, असे बडदे यांचे म्हणणे होते. त्या आंदोलनाला आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे उपस्थित होते. त्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी हा टोला लगावला.
म्हणाले, गेल्या ३० ते ४० वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. या विषयाची फक्त चर्चा झाली. मात्र, हा पुतळा उभारण्याचे पवित्र काम आपल्याला लाभले हे मी माझे भाग्य समजतो. माझ्यासह आमच्या असंख्य यश आले आहे. काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले, करण ससाणे यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. आता त्यांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून प्रायश्चित्त करावे, असे विखे पाटील यांनी सांगितले.
विखे पाटील म्हणाले, गेल्या ३० ते ४० वर्षापासून कार्यकर्त्याच्या प्रयत्नाला हे हा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, हा पुतळा उभारण्याचे पवित्र काम आपल्याला लाभले हे मी माझे भाग्य समजतो.
Breaking News: Congress leaders should repent before the statue Radhakrishna Vikhe Patil
















































