अहिल्यानगर: बनावट कागदपत्रे बनवून कंपनीला ३२ लाखांचा गंडा
Breaking News | Ahilyanagar Crime: एका फायनान्स कंपनीला ३३ कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल.

अहिल्यानगर : फायनान्स कंपन्यांकडून खातेदारांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र, बनावट कागदपत्रे तयार करून कर्ज घेऊन परतफेड न करता एका फायनान्स कंपनीला ३३ कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०२२ ते मार्च २०२४ दरम्यान फायनान्स कंपनीच्या अहिल्यानगरच्या शाखेत घडला. याप्रकरणी सहा जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा बुधवारी नोंदविण्यात आला आहे.
सुलताना फकरोद्दीन सय्यद, रौकीब फरोद्दीन सय्यद (दोघे रा. जवखेडे खालासा, ता. पाथर्डी), अमोल पोपट शिंदे, जयश्री अमोल शिंदे (दोघे रा. माधवबाग, सोनई, ता. नेवासा), विकास सुनील भुजबळ, सायली रमेश जाधव (दोघे रा. येळेपणे, ता. श्रीगोंदा), असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. कंपनीचे व्यवस्थापक दिगंबर संदीपान फुले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ते फेड बैंक फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीच्या अहिल्यानगर शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून कंपनीकडून कर्ज घेतले; परंतु त्यांनी कर्जाचे हप्ते न भरल्याने कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
या चौकशीत कर्जदारांनी दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. कर्जदारांनी बनावट कागदपत्रे देऊन कर्ज मिळविले असून, कंपनी फसवणूक झाली आहे, अशी व्यवस्थापक फुले यांची खात्री झाली. त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.
Breaking News: Company defrauded of Rs 32 lakhs by making fake documents
















































