Home संगमनेर संगमनेर: “त्या” वक्तव्यावर आ. थोरात यांची जहरी टीका

संगमनेर: “त्या” वक्तव्यावर आ. थोरात यांची जहरी टीका

Breaking News | Sangamner: महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांची वृत्ती आणि राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर करणाऱ्यांची वृत्ती एकच.

Coming to thorat  statement. Thorat's venomous criticism.jpeg

संगमनेर: महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांची वृत्ती आणि राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर करणाऱ्यांची वृत्ती एकच आहे, अशी जहरी टीका काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मारण्याची धमकी दिल्याने त्यांचा आवाज बंद होणार नाही. राहुल गांधींनी आजवर कायम संविधान रक्षणाची भूमिका घेतली आहे. ते जे बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी घालून त्यांना बदनाम करण्याचे जे षडयंत्र सुरू आहे, ते कधीही यशस्वी होणार नाही. त्यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणात नाही, काँग्रेसचे कोट्यवधी कार्यकर्ते राहुल गांधींची ढाल आहेत. महत्त्वाचे म्हणजे या देशातील सामान्य जनता त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. संजय गायकवाड या आमदाराच्या बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि राज्यात जर कायद्याचे थोडेबहुत राज्य शिल्लक असेल तर तातडीने संजय गायकवाडच्या मुसक्या आवळून, राज्य सरकारने अशा विषवल्लीला मुळापासून उखडून फेकले पाहिजे, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्रिट करून केली आहे.

Web Title: Coming to “that” statement. Thorat’s venomous criticism

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here