Home अहिल्यानगर अहिल्यानगर: महाविद्यालयीन तरुणीला मोटारसायकलवरून पळवले

अहिल्यानगर: महाविद्यालयीन तरुणीला मोटारसायकलवरून पळवले

Breaking News | Ahilyanagar: बळजबरीने प्रेमात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिला मारहाण करत दुचाकीवरून पळवून नेण्यात आले. पाठलाग करून तरुणाला पकडले असता त्याने तरुणीला चॉपर लावून धमकावण्याचा सिनेस्टाइल थरार.

College girl abducted on motorcycle

श्रीरामपूर : श्रीरामपुरात महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीची फसवणूक करून तिला बळजबरीने प्रेमात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिला मारहाण करत दुचाकीवरून पळवून नेण्यात आले. पाठलाग करून तरुणाला पकडले असता त्याने तरुणीला चॉपर लावून धमकावण्याचा सिनेस्टाइल थरार घडला. अखेर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शाहिद सादिक शहा (वय २५, रा. कुकाणा, ता. नेवासा) याला अटक केली आहे. होस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणीला विरा नावाच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून संपर्क झाला. तरुणाने आपले नाव विरू यादव असे सांगितले. मात्र, दोन-तीन महिन्यांनंतर तरुणाचे नाव शाहिद शहा असल्याचे तरुणीला समजले. त्यामुळे तिने संभाषण बंद केले. तरुण शहा याने तरुणीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिला भेटायला बोलावले. ३० सप्टेंबरला सकाळी तरुणी एका कॅफेमध्ये गेली. तेव्हा तरुणीने त्याला शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगत प्रेमसंबंधाला नकार दिला. १० ऑक्टोबरला सकाळी शाहिद शहा याचा फोन आला व त्याने धमकावून कॅफेमध्ये येण्यास सांगितले. तरुणीने मावसभावाला हा सर्व प्रकार सांगितला. कॅफेवर गेली असता शाहिदने तिच्याशी गैरवर्तन केले. कानाखाली मारून धमकावले व जबरदस्तीने दुचाकीवर बसायला लावून तो  नेवाश्याच्या दिशेने निघाला असे फिर्यादीत नमूद केले.

पीडितेच्या मावसभावाने नेवासा रस्त्याने शाहिदचा पाठलाग केला. शाहिदने चॉपर काढून तरुणीच्या गळ्याला लावला. लोकांनी तरुणीला त्याच्या ताब्यातून सोडविले. नंतर पोलिस दाखल झाले. त्यांनी शाहिदला ताब्यात घेऊन नंतर अटक केली.

Breaking News: College girl abducted on motorcycle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here