व्यवस्थापकाकडून सहकारी महिलेवर बलात्कार
Breaking News | Nashik Crime: इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकाने कार्यालयात काम करणाऱ्या महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर.
नाशिक : नामांकित इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकाने कार्यालयात काम करणाऱ्या महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आधी लग्नाचे आमिष दाखवून नंतर टाळाटाळ करण्यात आल्याने महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास अग्रवाल (वय ५४, रा. पंजाब) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अग्रवाल गडकरी चौकातील नामांकित इन्शुरन्स कंपनीत प्रादेशिक व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. याच कार्यालयातील पिडिता कर्मचारी असून सन. २०२२ मध्ये संशयिताने महिलेस लग्नाचे आमिष दाखविल्याने दोघांमध्ये प्रेमसंबध प्रस्थापित झाले. या काळात संशयिताने आपल्या कार्यालयात, कश्यपी धरणावर घेऊन जात तसेच गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर येथील आनंदनगर भागात असलेल्या घरी घेऊन जात सहकारी असलेल्या महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. हा प्रकार दीड-दोन वर्षांपासून सुरू होता. काही महिन्यांपासून संशयिताने टाळाटाळ करण्यास सुरूवात केल्याने महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने लग्नासह आर्थिक मदत करण्यास नकार दिल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली.
Web Title: Co-worker raped by manager
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study