दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी केले सिनेस्टाईलने जेरबंद
राहुरी | Rahuri: राहुरी येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी शुक्रवारी रात्री सिनेस्टाईलने जेरबंद केले. दोघे जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.
दरोडा टाकण्याच्या हेतूने दोन मोटारसायकलवरून सहा जण आलेल्या राहुरी पुलानजीक आले असताना पोलिसांना तेथे संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत चार जणांना जेरबंद केले, मात्र दोन जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
सागर अशोक बर्डे, राहुल पोपट आघाव, रवींद्र सूर्यभान माळी, विनायक गणपत बर्डे या आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस निरीक्षक मुकंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस सचिन बागुल, उपनिरीक्षक गणेश शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल आयुब शेख, श्रीकृष्ण कोकण, शिवाजी खरात संभाजी शेडगे, निलेश मेटकर, सचिन ताजणे यांनी आरोपींना जेरबंद केले.
Web Title: Cinestyle arrests robbers in rahuri