Home अहमदनगर बिबट्याच्या हल्यात श्रीगोंदा तालुक्यातील मुलाचा बळी, आष्टी तालुक्यात घडली घटना

बिबट्याच्या हल्यात श्रीगोंदा तालुक्यातील मुलाचा बळी, आष्टी तालुक्यात घडली घटना

child was killed in a bibatya attack

अहमदनगर: बिबट्याने आष्टी तालुक्यात दुसरा बळी घेतला आहे. सुरडी येथे दोन दिवसांपूर्वी तरुण शेतकऱ्याचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर जवळच किन्ही येथे बिबट्याने मुलाचा बळी घेतला आहे.

बिबट्याने शेतातील विहिरीवर पाणी देण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय यश सुनील भापकर या मुलावर झेप घेऊन नेल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. बिबट्याने उचलून नेल्यानंतर काही वेळातच या परिसरात मुलाचा मृत अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती समजताच सर्पांचा परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी वनविभागाला कळविले त्यावरून अवघ्या काही मिनिटांत किन्ही येथे वन अधिकारी पोहोचले. मंगळवारी नागनाथ गर्जे यांना बिबट्याने  भरदिवसा हल्ला करीत ठार केले. या घटनेला दोनच दिवस उलटले होते. त्यातच यश कापकर हा मुलाचा खराटवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे. तो दिवाळी निमित्त आजी आजोबांकडे आला होता. शुक्रवारी तो काकासोबत तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला असता तुरीच्या पिकातून बिबट्याने झेप घेत काकासमोरच यशला उचलून नेले. यावेळी काकाने आरडाओरडा केला. शोधाशोध केली असता जवळच शेतात बोरीच्या झाडाखाली यशचा मृतदेह आढळून आला आहे.  

Web Title: child was killed in a bibatya attack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here