Drowns: कालव्यात बुडून मुलाचा मृत्यू
गोंदिया | Gondiya: जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील पानगाव येथील 14 वर्षीय मुलाचा कालव्यात बुडून (drowns) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमित हटीले असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.
पानगाव या गावाजवळील कालव्यात अमित हा आंघोळ करायला गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतलाच नाही म्हणून त्याच्या घरच्या लोकांनी शोधाशोध केली. परंतु, त्याचा थांगपत्ता लागला नाही. अखेर कालव्यात बुडाला असल्याची माहिती मिळाली.
कालव्यात शोध घेतला मात्र पाणी जास्त असल्याने मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने धरणाचा पाणी बंद करत आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने पुन्हा शोध कार्य सुरू केले. आज सकाळी या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. अमितच्या मृत्युने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Web Title: Child drowns in canal