ब्रेकिंग: जिल्हा परिषद शाळेसमोर सिमेंटचा बल्कर पलटी; चार-पाच चिमुकली चेंगरली
Solapur Accident: जिल्हा परिषद शाळेसमोर पलटी झाल्याची घटना काहीवेळापूर्वीच झाली असून या अपघातात सिमेंट बल्करखाली चार-पाच चिमुकली चेंगरल्याचा अंदाज.
सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर नेमका औज (आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर पलटी झाल्याची घटना काहीवेळापूर्वीच झाली असून या अपघातात सिमेंट बल्करखाली चार-पाच चिमुकली चेंगरल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर नेमका औज (आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर पलटी झाला. काहीवेळापूर्वीच हा अपघात झाला असून त्या सिमेंट बल्करखाली चार-पाच चिमुकली चेंगरल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
वळसंग पोलिसांची शोध मोहीम सुरु असून आतापर्यंत बल्करखाली चेंगरलेली एक चिमुकली पोलिसांना सापडली आहे. वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले हे स्वत: त्याठिकाणी उपस्थित आहेत. सिमेंट बल्कर चालक तेथून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांकडून सिमेंट बल्कर उचलण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. काहीवेळापूर्वीच हा भयानक अपघात झाला असून टायर पंक्चर झाल्याने की अन्य कोणत्या कारणास्तव सिमेंट बल्कर पलटी झाला याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
Web Title: Accident cement bulker overturned in front of Zilla Parishad School Four or five little girls crawled
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App