अहिल्यानगर: बेकायदा सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल
Breaking News | Ahilyanagar: बेकायदा सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल.

श्रीरामपूर : शहर पोलिसांनी बेलापूर येथील रोहित संतोष भालेकर यांच्या फिर्यादीवरून सुनील मुथा व मनीष मुथा यांच्याविरुद्ध बेकायदा सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुथा यांनी बेकायदेशीर सावकारी करून आपली मोटारसायकल गहाण ठेवत जादा व्याज व मुद्दलची मागणी केली होती, असे भालेकर यांचे म्हणणे आहे.
रोहित संतोष भालेकर यांनी मनीष मुथा व सुनील मुथा (दोघे रा. बेलापूर) यांच्या विरोधात बेकायदेशीर सावकारी करून त्यांची मोटारसायकल गहाण ठेवली, असा तक्रार अर्ज सादर केला होता. तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सहायक निबंधक यांना पोलिसांनी पत्रव्यवहार केला.
मुथा यांच्याकडे सावकारी कर्ज देय्याबाबत परवाना असल्याबाबत विचारणा केली होती. मात्र, दोघेही अधिकृत सावकार नसून त्यांच्याकडे कोणताही परवाना नाही, असा लेखी अभिप्राय निबंधक यांनी दिला.
नियमबाह्य दराने व्याज घेत बेकायदेशीर सावकारी कोणी करीत असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले आहे.
Breaking News: Case registered in illegal money lending case
















































