मुख्याध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
Ahmednagar News: मयत पतीच्या जागेवर काम देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावून शिवीगाळ करीत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी मुख्याध्यापक विरोधात विनयभंगाचा (molestation) गुन्हा दाखल.
श्रीगोंदा | Shrigonda: मयत पतीच्या जागेवर काम देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावून शिवीगाळ करीत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून गुंगा जगन्नाथ आरडे (रा. कामठी, ता. श्रीगोंदा) या मुख्याध्यापकाविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आरोपीने फिर्यादीस शाळेमध्ये बोलावून घेतले. यावेळी शिवीगाळ करीत तुला तुझ्या पतीच्या जागी काम देणार नाही, असे म्हणत अश्लील वर्तन केले. त्याचबरोबर परत आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, मुख्यध्यापक आरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाच्या गुन्ह्यातील फिर्यादी महिलेच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: a case of molestation has been filed against the principal
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App