Accident: दोन दिवसापूर्वी घेतलेली कारचा अपघात, तरुण ठार
Rahuri Accident News: स्वीफ्ट कारमधून श्रीरामपूर ते राहुरी फॅक्टरी या रस्त्यावरून प्रवास करताना अज्ञात वाहनाने हूल दिली. यावेळी कार विरुद्ध दिशेला जाऊन तीन-चार वेळा पलटी झाली.
राहुरी: देवळाली प्रवरा दोन दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या स्वीफ्ट कारमधून श्रीरामपूर ते राहुरी फॅक्टरी या रस्त्यावरून प्रवास करताना अज्ञात वाहनाने हूल दिली. यावेळी कार विरुद्ध दिशेला जाऊन तीन-चार वेळा पलटी झाली. त्यात ओंकार ऊर्फ ओम दादा पुंड (वय १९, रा. राहुरी फॅक्टरी) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
हा अपघात बुधवारी (दि.२७) रात्री देवळाली प्रवरा इरिगेशन बंगला कॉलनी जवळ झाला. राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील हा तरुण होता. त्याने दोन दिवसांपूर्वी स्वीफ्ट कार खरेदी केली होती. बुधवारी रात्री स्विफ्ट कारमधून श्रीरामपूरवरून राहुरी फॅक्टरी येथे आपल्या घरी जात असताना देवळाली बंगला परिसरात स्विफ्ट कारला अज्ञात वाहनाने हूल मारली त्यामध्ये ओम हा स्वतः कार चालवत होता. त्याचा कारवरील ताबा सुटला. कारने तीन चार पलट्या खाल्ल्या. यात तो गंभीर झाला. त्यास रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मयत ओंकार याच्या पश्चात आई, वडील, बहीण आदी परिवार आहे. ओंकार हा एकुलता होता. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत ओंकार याच्या पश्चात आई, वडील, बहीण आदी परिवार आहे. अपघात झाला त्यावेळी नगरसेवक आदिनाथ कराळे, जगन्नाथ मुसमाडे, नीलेश पवार, वसीम शेख, सचिन रसाळ, बापू मुसमाडे बाळासाहेब मुसमाडे, महेश पवार, विक्रम फाटे, विजय मुसमाडे, रवींद्र मुसमाडे आदींसह परिसरातील नागरिकांनी मदत केली. भीमतेज मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेद्वारे तातडीने राहुरी येथील सरकारी दवाखान्यात त्याला उपचारासाठी नेण्यात आले होते, मात्र दुर्देवाने त्याचा आधीच मृत्यू झाला होता.
Web Title: Car accident two days ago, youth killed