चक्क रुग्णवाहिकेतून होत होती गांजाची तस्करी, २ रुग्णाहिका पोलिसांच्या ताब्यात
Breaking News | Crime: चक्क रुग्णवाहिकेतून गांजाची तस्करी, पोलिसांनी सापळा रचून या चारही आरोंपींना अटक. (Cannabis was being smuggled)
पुणे: पिंपरी चिंचवड परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने एकाच दिवशी केलेल्या दोन कारवाईत 1 कोटी 31 लाख 55 हजार 300 रूपये किमतीचा जवळपास 96 किलो 87 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
या प्रकरणी कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे, हनुमंत भाऊसाहेब कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे या चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक चार चाकी वाहन आणि दोन मोठ्या रुग्णवाहिका जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड शहरात चारचाकी वाहन आणि काही रुग्णवाहिकेतून गांजाची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती अंमलीपदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या चारही आरोंपींना अटक केली. सोबतच त्यांच्या ताब्यातून एक चार चाकी वाहन आणि दोन मोठ्या रुग्णवाहिका जप्त केल्या आहेत.
दुसऱ्या एका ठिकाणी तसेच उत्तर प्रदेश येथील काही आरोपी महळूंगे पोलीस स्टेशन हद्दीत गांजा तस्करी करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी सन्नीदेवल सिद्धनाथ शर्मा आणि सन्नीदेवल भगवानदास भारती यांना ताब्यात घेतलं. तसचं त्यांच्याकडून 2१ किलो गांजा जप्त केला आहे.
Web Title: Cannabis was being smuggled through ambulances
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News