मेणबत्ती कारखान्याला आग; तीन महिलांसह मुलीचा मृत्यू
Dhule Crime: एका मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात स्फोट होऊन आग (Fire) लागल्याची घटना.
धुळे: साक्री तालुक्यातील चिपलीपाडा शिवारातील एका मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात स्फोट होऊन आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत तीन महिला व एका मुलीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. मयतांमध्ये माय- लेकीचा समावेश आहे. दोन महिला जखमी झाल्या आहेत. जगन्नाथ रघुनाथ कुंवर (रा. वासखेडी) या कारखाना चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. आगीत आशाबाई भय्या भागवत (३४), पूनम भय्या भागवत (१६), नयनाबाई संजय माळी (४८, तिन्ही रा. जैताणे), सिंधूबाई धुडकू राजपूत (५५, रा. निजामपूर, ता. साक्री) या जागीच मृत झाल्या, तर निकिता सुरेश महाजन (१८), संगीता प्रमोद चव्हाण (५५) या भाजल्या असून, त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे.
या कारखान्यात मेणबत्तीसोबतच फटाके तयार केले जात असल्याची चर्चा आहे. त्याचाच स्फोट होऊन ही आग लागल्याची घटनास्थळी चर्चा होती. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
Web Title: candle factory fire Girl dies along with three women
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App