Home अहमदनगर तो आला, तीही निघाली अन् पकडले गेले !

तो आला, तीही निघाली अन् पकडले गेले !

Breaking News | Ahmednagar:  धुमस्टाईलने विद्यार्थिनीला पळवून नेण्याच्या तयारीत असतानाच, मुख्याध्यापक व स्टाफच्या सतर्कतेने त्यांचा प्लॅन फसला.

came, she left and was caught

श्रीरामपूर : एकमेकांच्या नाव-गावाचा परिचय नसताना दोघांची सोशल मीडियावर “चॅट’वर दोन दिवसांत ओळख झाली. पुढील दोन दिवस अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चौंटंग झाले आणि पाचव्या दिवशी तिने आपल्या शाळेच लोकेशन त्याला टाकले. तो हीरो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ८० किलोमीटरहून चक्क शाळेत हजर. धुमस्टाईलने विद्यार्थिनीला पळवून नेण्याच्या तयारीत असतानाच, मुख्याध्यापक व स्टाफच्या सतर्कतेने त्यांचा प्लॅन फसला…

तालुक्यातील एका गावातील शाळेत हा प्रकार घडला. न्यू इंग्लिश स्कूल असे नामाभिधान असलेल्या माध्यमिक विद्यालयात काल सकाळी सर्व वर्ग सुरू असताना मोटारसायकल स्टँडवर ऐटीत मोटारसायकल लावून पांढरा टी-शर्ट, पाठीवर बॅग लटकवलेल्या तरुणाने शाळेच्या व्हरांड्यात प्रवेश केला. मुख्याध्यापक जी. बी. नाईक बाहेरच उभे होते. त्या ‘हीरो’कडे पाहत होते. ‘हीरो’ने दहावीत शिकणाऱ्या मुलीचे नाव सांगून, ‘मी तिच्या आत्याचा मुलगा आहे, तिला घेण्यासाठी आलो आहे. तिला तिच्या घरी घेऊन जायचे आहे,’ असे सांगितले. विद्यार्थिनीला निरोप दिला, तीही जणू तयारीतच असल्यासारखी पाठीवर बेंग लटकावून वर्गाबाहेर आली. दोघांनी एकमेकांना पाहिलेले नसल्याने गडबड होऊ नये म्हणून हीरी लगबगीने विद्यार्थिनीजवळ गेला, तिच्याशी कुजबूज करू लागला….

तेवढ्यात शिक्षक मुकुंद कालांगडे व एस. बी. उंडे वर्गाबाहेर आले आणि मुख्याध्यापकांच्या जवळ उभे राहिले. उंडे यांना मात्र संशय आला. त्यांनी तातडीने त्या विद्यार्थिनीच्या घरी मोबाईलवरून संपर्क साधला. मात्र ‘आम्ही कुणा भाच्याला पाठवले नाही. आणि आम्हाला भाचाही नाही,’ असे विद्यार्थिनीच्या घरून सांगण्यात आले. त्यामुळे काय सुरू असावे, याचा अंदाज शिक्षकांना आला आणि त्यांनी तातडीने हीरोला रोखण्याचा निर्णय घेतला.

तो तरुण विद्याविनीसह मोटारसायकलकडे धाव घेण्याच्या तयारीत असतानाच सेवक टी. ई. चौधरी यांनी त्याची कॉलर पकडली. अन्य शिक्षकांच्या मदतीने त्याला ओडत कार्यालयात आणले, विद्यार्थिनीचे नातेवाईकही अवघ्या वीस मिनिटांत शाळेत हजर झाले.

आजूबाजूला गजबजलेल्या परिसरात ही वार्ता समजताच शेकडो तरुणांची शाळेत गर्दी झाली. मुलीच्या गावातूनही तरुण आले. शालेय शिक्षण समिती पदाधिकारी, उपसरपंच, पत्रकार आल्यानंतर तरुणाला खोलीत बंद करून संरक्षण देण्यात आले. कारण बाहेर तरुण आरडाओरडा करून ‘त्याला आमच्या ताब्यात ह्या,’ अशी मागणी करत होते. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला घटनेची खबर देण्यात आली. संतप्त जमावाच्या तीव्र भावना पाहून विद्याथिनौ, तिचे आई-वडील आणि तो ‘हीरो’ यांना गाडीत बसवून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात हजर केले. ‘हीरो’ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याचे पालकही नंतर पोलिस ठाण्यात आले. त्यांच्या भविष्याचा विचार करून कारवाई केली नसल्याचे समजले.

Web Title: came, she left and was caught

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here