संगमनेरात कॅफे शॉपवर छापे, कॅफेमध्ये आक्षेपार्ह वर्तन
Sangamner Cafe News: कॅफे शॉपमध्ये १५ मुले व १४ मुली आढळून आल्या.
संगमनेर: संगमनेर शहरात गेल्या काही महिन्यांपासून कॅफे शॉपची संख्या वाढताना दिसून येत आहे. संगमनेर पोलिसांनी शहरातील काही वादग्रस्त ठरलेल्या पाच कॅफे शॉपवर छापे टाकले. यावेळी काही कॅफे शॉपमध्ये १५ मुले व १४ मुली आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या मुलांची चौकशी करून समज देत सोडून देण्यात आले.
नाशिक-पुणे महामार्गावरील महाविद्यालयांपासून जवळच्या अंतरावर हे कॅफे शॉप आहेत. या कॅफे शॉपमध्ये युवक युवतींचे वेगवेगळे उद्योग चालू असतात. शहर पोलिसांनी या कॅफे शॉपची माहिती घेऊन काल सकाळी अचानक त्यांच्यावर छापा टाकला. या कारवाईमध्ये पोलिसांना विविध कॅफे शॉपमध्ये 15 मुलं तर 14 मुली आढळून आले आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यात एक अल्पवयीन मुलगी आढळली. तिला पोलीस ठाण्यात आणून तात्काळ सोडण्यात आले. शहरातील काही कॅफेमध्ये आक्षेपार्ह वर्तन करताना देखील मुलं-मुली आढळून आले आहेत. त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करून समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले.
Web Title: Cafe shop raids in Sangamner