आगीने बस जळुन खाकः २४ प्रवासी बचावले- Fire
औरंगाबाद-नगर महामार्गावर ढोरेगावनजीक मध्यरात्र घटना, औरंगाबाद-नगर महामार्गावर ढोरेगावनजीक एसटी महामंडळाची बस जळून (fire) खाक झाली. एसटीच्या अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट.
गंगापूर: औरंगाबाद-नगर महामार्गावर ढोरेगावनजीक -राज्य परिवाहन महामंडळाची बस नाशिकहून हिंगोलीकडे जाणारी एसटी बसच्या इंजिनला मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये बस जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
यासंदर्भात मिळालेली माहिती -अशी की, हिंगोली आगाराची बस क्र. एम. एच. १४ बी. टी. ४८०५ ही बस नाशिक बसस्थानकातून २५ प्रवासी घेउन औरंगाबाद मार्गे हिंगोलीला जात असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ढोरेगावपासून पुढे काही अंतरावर पेंडापूर फाट्यानजीक गाडीच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याचे या गाडीवरील चालक रामेश्वर लोखंडे यांच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगावधान दाखवून बस तत्काळ रस्त्याच्या कडेला थांबवून वाहक पुंडलिक नारळे यांच्या मदतीने प्रवाशांना तत्काळ खाली उतरवले.
दरम्यान, गंगापूर ठाण्याचे उपनिरीक्षक चौरे, पोका. अमित पाटील, राहुल वडमारे, श्रीकांत बर्डे, रिजवान शेख, रवी लोदवाल, पदम जाधव आदींनी प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवले होते. प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या चालक व वाहकांचा यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपमहाव्यवस्थापक मैद, प्रादेशिक अभियंता पाटील, औरंगाबाद विभागाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, यंत्र अभियंता सोमवंशी, गंगापूर आगारा आगार व्यवस्थापक जवळेकर यांचा समावेश होता.
Web Title: Bus gutted by fire 24 passengers rescued