Home महाराष्ट्र रायगडवरून परतताना बस दरीत कोसळली, बसमध्ये चालकासह ४५ जण

रायगडवरून परतताना बस दरीत कोसळली, बसमध्ये चालकासह ४५ जण

Breaking News | Mahad: शिवभक्तांच्या बसला परतीच्या मार्गावर असताना अपघात.

bus fell into the valley while returning from Raigad

महाड : नवी मुंबईतील ऐरोली येथून रायगड दर्शनासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या बसला परतीच्या मार्गावर असताना अपघात झाला. बस एका अवघड वळणार ७० फूट दरीत कोसळली. सुदैवाने बसमधील सर्वजण सुखरूप बाहेर पडले.

बसमध्ये चालकासह ४५ जण होते. रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रायगडापासून काही अंतरावर असलेल्या कोणझर गाव हद्दीत हा अपघात झाला. घटनास्थळी पोलिस प्रशासनासह रुग्णवाहिका तसेच रेस्क्यू पथक दाखल झाले होते. ऐरोली येथून खासगी बसने हे सर्वजण रविवारी सकाळी किल्ले रायगडावर आले होते. गड पाहून आल्यावर ते रायगडच्या पायथ्यावरून बसने परत निघाले होते. महाड तालुक्यातील कोंझर घाटामध्ये एका अवघड वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला.

Web Title: bus fell into the valley while returning from Raigad

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here