चक्क ‘फोन पे’ व्दारे वकिलाचे लुटले एवढे रुपये, नगरमध्ये भावानेच केले कृत्य
Breaking News | Ahmednagar: मावस भावाने करून 2 लाख 1 हजार रूपये फोन पे व्दारे काढून घेत फसवणूक केल्याची घटना. (Robbed)
अहमदनगर: वकिलाच्या मोबाईलचा वापर त्यांच्या मावस भावाने करून 2 लाख 1 हजार रूपये फोन पे व्दारे काढून घेत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. सदर प्रकार 29 डिसेंबर 2023 ते 3 जानेवारी 2024 च्या दरम्यान मुकुंदनगर परिसरात व जिल्हा न्यायालयासमोर घडला आहे.
याप्रकरणी मुकुंदनगर परिसरात राहणार्या वकिलाने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमान सादीक शेख (रा. अल अमील ग्राऊंडजवळ, मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी व अमान हे दोघे मावस भाऊ आहेत. अमान याने 29 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या फोन पे नंबर वरून त्याच्या फोन पे नंबरवर अन्यायाने व विश्वासघात करून एकुण दोन लाख एक हजार रूपयांची रक्कम पाठवली. सदरचा प्रकार फिर्यादीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अमान शेख विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार डी.व्ही झरेकर करीत आहेत.
Web Title: Brother robbed a lawyer of Rs 2 lakh
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News