खळबळजनक घटना: युवकाचा मृतदेह विहीरीत आढळला, घातपाताचा संशय
राहता: राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील एका युवकाचा मृतदेह राजुरी येथील विहीरीत एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मयत बाळासाहेब माधव घोरपडे रा.पिंपरी निर्मळ वय ३७ हा युवक हा शुक्रवार सायंकाळ पसुन गायब होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला होता. मात्र तो आढळुन आला नाही.
शनिवारी त्याचा मृतदेह राजुरी येथील कॅनलच्या बाजुस असलेल्या गट.नं १३७ मधील विहीरीत आढळुन आला आहे. त्याच्याकडे कोणतेही वाहन नसतांना गावातुन सहा सात किलोमीटर अंतरावरील विहीरीत हा मृतदेह आढळून आला आहे.
अत्यंत मनमिळावु स्वभाव असलेला बाळासाहेब आत्महत्या करू शकतो याबाबत कुटुंबीयांचा व ग्रामस्थांचा विश्वास बसत नसुन हा मृत्यु की घातपात (Suicide or Murder) याबबत लोणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी असा अर्ज कुटुंबियांनी दिला आहे.
याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉस्टेबल जोसेफ साळवी करीत आहे.
Web Title: body of the youth was found in the well murder or Suicide