Home अहमदनगर नगरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, या नेत्याने केला भाजपात प्रवेश

नगरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, या नेत्याने केला भाजपात प्रवेश

big blow to the Congress in the city, this leader joined the BJP

Ahmednagar | अहमदनगर:  नगरमध्ये कॉग्रेसला धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब भुजबळ यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला आहे.

भाजप हा लोकशाही मूल्य जपणारा व  अंतर्गत लोकशाही पाळत सर्वांना समान संधी देणारा देशातील एकमेव पक्ष आहे. सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत. नगरमध्ये आज भुजबळ यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाचे बळ नक्कीच वाढणार आहे, असे प्रतिपादन मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार  यांनी केले.

आ. शेलार हे बुधवारी नगरमध्ये आले होते. लेंडकर मळा येथे शहर भाजपच्या वतीने आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमात त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, सविता मोरे व ओंकार लेंडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अध्यक्षस्थानी शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे होते. यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, नगरसेवक प्रदीप परदेशी, नरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, बाबा सानप आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: big blow to the Congress in the city, this leader joined the BJP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here