संगमनेर: दुधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे अटकेत
Breaking News | Sangamner: दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या आर्थिक अपहारप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.
संगमनेर: दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या आर्थिक अपहारप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, त्यांचे कुटुंबातील काही सदस्य, संस्था व्यवस्थापक आणि इतर अशा २१ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अध्यक्ष भाऊसाहेब कुटे हे पसार होते.
अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत असताना कुटे हे गुरुवारी (दि.२३) दुपारी एक वाजेच्या सुमारास संगमनेर शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांना अटक करण्यात आली आहे. पतसंस्थेत २०१७-२०२२ या काळातील अंतर्गत लेखापरीक्षण करण्यात आले होते. अफरातफर झाल्याचे लेखापरीक्षण माध्यमातून समोर आले होते. ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहारप्रकरणी अध्यक्ष कुटे यांच्यासह २१ जणांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून मुख्य सूत्रधार कुटे पसार होते. सुमारे ९ महिने पसार होते. बाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवी मगर म्हणाले भाऊसाहेब कुटे यांच्या पाठीमागे आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक होते. त्यांना अटक करण्यात आली आहे.
Web Title: Bhausaheb Kute, Chairman of Dudhganga Credit Union, arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study