बाळ बोठेला जामीन मंजूर, रेखा जरे यांची हत्या प्रकरण
Breaking News | Bal Bothe: सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या झाली होती. याप्रकरणी बाळ बोठेला अटक करण्यात आली होती.

अहिल्यानगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ ज. बोठे याला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश व विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने बुधवारी जामीन मंजूर केला.
३० नोव्हेंबर २०२० रोजी सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या झाली होती. याप्रकरणी बाळ बोठेला अटक करण्यात आली होती. या खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील सागर भिंगारदिवे याला काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला आहे. बोठे याने औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. त्याविरोधात बोठे याने वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपीच्या वतीने सुदंशू चौधरी, कैलास औताडेंनी काम पाहिले.
Breaking News: Bal Bothe granted bail
















































