Home महाराष्ट्र ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला

Atul Parchure Passes Away: अतुल परचुरे यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Atul Parchure Passes Away

Atul Parchure: मराठी चित्रपटसृष्टीमधून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.  ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती.

अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. ते अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या समोर आले होते. त्यांना एका कार्यक्रमात सर्व मराठी कलाकारांनी सलामी दिली होती. पण दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांचं आज निधन झाल्याची अत्यंत दुर्देवी बातमी समोर आली आहे.  अतुल परचुरे यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

Web Title: Atul Parchure Passes Away

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here