कुऱ्हाडीने हल्ला करून पळालेला दरोडेखोर थेट विहिरीत पडला
शेतकऱ्याच्या घरावर दरोडा टाकण्यासाठी आले. मात्र, गोंधळ उडाल्याने पळत सुटले. त्यांच्यापैकी – एक दरोडेखोर विहिरीत पडला.
करमाळा | सोलापूर: तालुक्यात कोर्टी येथे रविवारी मध्यरात्री १:३० वाजेदरम्यान पाच ते सहा जण एका शेतकऱ्याच्या घरावर दरोडा टाकण्यासाठी आले. मात्र, गोंधळ उडाल्याने पळत सुटले. त्यांच्यापैकी – एक दरोडेखोर विहिरीत पडला आणि तो गंभीर जखमी झाला. यावेळी – झालेल्या दगडफेकीत दोन जण – जखमी झाल्याची घटना घडली आहे. नितीन ऊर्फ नीतू वैशा भोसले (रा. – भेंडाळा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यासह पाच अनोळखी संशयित दरोडेखोरांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याप्रकरणी अनिल शिंदे (रा. कोर्टी, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. अनिल शिंदे हे कोर्टी गावापासून काही अंतरावर ठाकरवस्तीवर राहतात. रविवारी मध्यरात्री शिंदे यांना घराच्या खिडकीतून बॅटरीचा उजेड दिसून आला. ते बाहेर येऊन पाहिले असता अनोळखी पाच ते सहा जण दबा धरून बसलेले दिसून आले.
चोरट्यांनी अनिल शिंदे यांच्या पाठीवर कुन्हाड आणि पायावर धारदार शस्त्राने वार करून मोबाइल काढून घेतला. हा गोंधळ ऐकून शिंदे यांचा भाऊ कुमार हा मदतीला धाऊन आला. दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या दगडफेकीत कुमार हा जखमी झाला.
Web Title: Attacked with an ax, the robber who ran away fell straight into the well
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App