Home अहिल्यानगर अहमदनगर: सरपंचावर कोयत्याने हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर: सरपंचावर कोयत्याने हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न

Breaking News | Ahmednagar: मागासवर्गीय सरपंचावर कोयत्याने हल्ला करत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना.

Attack on sarpanch with coyote, attempt to kill him

अहमदनगर: मागासवर्गीय सरपंचावर कोयत्याने हल्ला करत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील घोसपुरी गावात शनिवारी (दि. २०) दुपारी घडली. या प्रकरणी अय्याज शौकत शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घोसपुरीचे सरपंच किरण साळवे यांनी फिर्याद दिली आहे. घोसपुरीत रस्त्यावर चिखल होऊ नये, म्हणून ग्रामपंचायततर्फे मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. शनिवारी (दि. २०) दुपारी ३ वाजता सरपंच किरण साळवे, उपसरपंच विठ्ठल हंडोरे व ग्रामपंचायत सदस्य हे काम कसे चालले आहे याची पाहणी करत होते. त्या वेळी आरोपी अय्याज शेख तेथे मोटरसायकलवर

आला. त्याने सरपंच साळवे यांना जातिवाचक शिवीगाळ करत तुला सांगितले ना घरासमोर मुरूम टाकू नको, तू जातीच्या जीवावर लय माजला काय, थांब तुझा माज जिरवतो, असे म्हणत घरातून धारदार कोयता आणून सरपंच साळवे यांच्यावर वार केला. मात्र, त्या वेळी सरपंच साळवे मागे सरकल्याने ते थोडक्यात बचावले. त्यानंतर त्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या आईने त्याच्या अंगावर उडी मारली व त्याचा वार हुकवला. त्यानंतर त्याने सरपंच साळवे, तसेच उपसरपंच विठ्ठल हंडोरे यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत सरपंच साळवे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.

Web Title: Attack on sarpanch with coyote, attempt to kill him

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here