अहमदनगर महिलेवर अत्याचार, युवकास सक्तमजुरी
अहमदनगर | Ahmednagar: वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करणाऱ्या युवकास जिल्हा न्यायाधीश एम.व्ही. देशपांडे यांनी १२ वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.तसेच १० हजारांचा दंड न भरल्यास १० महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.
अहमदनगर येथील मीरावली बाबा दर्गा येथे दर्शनासाठी आलेल्या वयोवृद्ध महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजेंद्र दशरथ दुसुंगे वय ३० रा. वारूळवाडी ता. नगर याच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २४ जुलै २०२१ रोजी ही घटना घडली. सरकारी पक्षाच्या वतीने सतीश पाटील या वकिलांनी बाजू मांडली.
वयोवृद्ध महिला दर्शनासाठी मीरावली बाबा दर्गा येथे आली होती. एक दिवस टी तिथेच मुक्कामी राहिली. दुसऱ्या दिवशी महिला घरी जाण्यासाठी निघाली असता आरोपीने तिच्याकडे विचारपूस केली. आणि तिला मोटारसायकलवर बसविले. काहीं अंतरावर गेल्यावर आरोपीने महिलेला खड्ड्यात फरफटत नेले. जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने महिलेकडील मोबाईल व पिशवीतील पैसे बळजबरीने काढून घेतले. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा जबाब नोंदविण्यात आला.
Web Title: Atrocities on Ahmednagar woman