Home पुणे सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका, राज्यातून होतेय टीका

सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका, राज्यातून होतेय टीका

Breaking News | Sharad Pawar: सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राज्यातून टीकेची झोड त्यांच्यावर होत आहे.

Assembly Elections Sadabhau Khot's controversial criticism of Sharad Pawar

Sharad Pawar: आमदार सदाभाऊ खोत यांनी खासदार शरद पवार यांच्या चेहऱ्यावर भाष्य करत टीका केली. त्यांच्या या अभद्र विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अनेक नेत्यांनी खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील खोत यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. दरम्यान, खोत यांनी त्यांनी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना माझ्या भाषेमुळे कुणाच्या भावना दुखाववल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. माझी गावगाड्याची भाषा आहे. काही लोकांनी त्या शब्दाच्या अर्थाचा विपर्यास केला. त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो. गावगाड्याची भाषा असते. एखादा आभाळाकडं बघत असला तर आम्ही म्हणतो आरशात जाऊन बघ. गावगाड्याची भाषा समजायला मातीत रुजावे लागते. मातीत राबावे लागते आणि मातीतच मरावे लागते. तेव्हाच गावाकडेची आणि मातीची भाषा समजते अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त करताना दिली.

सदाभाऊ खोत काय म्हणाले? “शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसवाले असतील… देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत माहितीय का? गायीची जी कास आहे, त्या कासला चार थानं असतात. यामधील अर्धथानं वासराला पाजायचं (म्हणजे आपल्याला) आणि साडेतीन थानातलं दूध आपणचं हाणायचं. पण, देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, गायीचं सगळं दूध वासरांचं (राज्यातील जनतेचं) आहे, मी सगळं दूध वासरांनाच देणार.. मग पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या. ते म्हणाले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं..?”

“पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या… पण पवारसाहेबांना मानावं लागेल. ते म्हणतायत की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. तुम्हाला काय तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र पाहिजे का?” अशी बोचरी टीका सदाभाऊ खोतांनी यावेळी केली.

अजित पवारांचा सदाभाऊंना इशारा

“ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्याविषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही.

Web Title: Assembly Elections Sadabhau Khot’s controversial criticism of Sharad Pawar

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here