जयश्री थोरातांनी सुजय विखेंना सुनावले खडेबोल
Maharashtra Assembly Elections 2024 | Balasaheb Thorat vs Sujay Vikhe: मी बाळासाहेब थोरात यांची मुलगी, संयम राखू शकते, चांगली खनकावू पण शकते. बोलायचे असेल तर शिस्तीत बोला,” असा इशारा.
संगमनेर: खासदार सुजय विखे यांनी गेल्या काही दिवसांपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघात अनेक सभा घेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे.
इथे येऊन माझी टिंगल करताय, मी बाळासाहेब थोरात यांची मुलगी असून, संयम राखू शकते, मात्र वेळ प्रसंगी चांगली ठणकावू शकते, अशा शब्दात जयश्री थोरात यांनी सुजय विखे यांना खडे बोल सुनावले आहेत..
“संगमनेर तालुका हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला आहे. आम्हाला गर्दी गोळा करण्यासाठी बसेस पाठवाव्या लागत नाहीत. इथल्या जनतेचे बाळासाहेब थोरात यांच्यावर नितांत प्रेम आहे. मात्र आता काळ वेगळा आहे. आपल्याला या बालेकिल्ल्याचे रक्षण करायचे आहे. बाहेरची ताकद आक्रमण करत आहे.
जेव्हा ते बाळासाहेब थोरात यांच्यावर बोलतात तेव्हा संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचते. ते मला म्हणतात “ताई ओ ताई”, कुणाची टिंगल करताय? मी बाळासाहेब थोरात यांची मुलगी, संयम राखू शकते, चांगली खनकावू पण शकते. बोलायचे असेल तर शिस्तीत बोला,” असा इशारा जयश्री थोरात यांनी दिला.
Web Title: Assembly Elections Jayashree Thorat spoke harshly to Sujay Vikhe
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study