Home अहिल्यानगर पत्नीशी वाद, पतिचा स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीशी वाद, पतिचा स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

Breaking News | Ahilyanagar Crime: तरुणाने पत्नीशी झालेल्या वादाच्या कारणावरुन गावठी कट्ट्यातून स्वतःवर गोळी झाडून घेतली.

Argument with wife, husband attempts suicide by shooting himself

राहुरी:  राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे एका तरुणाने पत्नीशी झालेल्या वादाच्या कारणावरुन गावठी कट्ट्यातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदरची घटना ही आज (बुधवार) दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  सोमनाथ रामभाऊ वाकचौरे, वय 32 वर्षे, हा कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवाशी आहे. सोमनाथ वाकचौरे याचे त्याच्या पत्नीशी नेहमीच वाद होत असल्याने त्याची पत्नी काही दिवसांपासुन राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे तीच्या माहेरी राहत होती. सोमनाथ वाकचौरे हा काल चिंचोली फाटा येथे आला होता. त्याने पत्नीशी वाद करुन मारहाण व दमबाजी केली होती. याबाबत काल दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी सोमनाथ वाकचौरे याच्या पत्नीने सोमनाथ याच्या विरोधात पोलीसात तक्रार दिली होती. त्यानंतर सोमनाथ वाकचौरे याने दुपारी दिड वाजे दरम्यान या कारणावरुन चिंचोली फाट्या जवळील भंडारदरा उजव्या कालव्या लगत गावठी कट्ट्यातून स्वतःच्या हनुवटीच्या खाली गोळी झाडून घेतली.

गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक त्याच्या जवळ गेले. तेव्हा सोमनाथ हा रक्तभंबाळ होऊन गंभीर जखमी झालेला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार, सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, हवालदार सोमनाथ जायभाय, सतिष आवारे, राहुव यादव, अंकूश भोसले आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पथकाने गावठी कट्टा जप्त करुन जखमी सोमनाथ रामभाऊ वाकचौरे याला ताब्यात घेऊन लोणी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Argument with wife, husband attempts suicide by shooting himself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here