Anil Deshmukh: अनिल देशमुखांना या तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई | Anil Deshmukh: मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अनिल देशमुख, सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना न्यायालयीन कोठडी २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अनिल देशमुख आता जामीनासाठी अर्ज करू शकतात. अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे तसेच मुंबई पोलीस सचिन वाझे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांची चौकशी करण्यात येत आहे.
Web Title: Anil Deshmukh remanded in judicial custody