अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिघा जणांनी पळविले
Ahmednagar | Rahuri | राहुरी: राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीना पळवून नेण्याचे सत्र सुरूच आहे. तालुक्यातील आरडगाव येथे ११ वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिघा जणांनी मोटारसायकलवर बसवून पळवून नेल्याची (Abduction of a Minor Girl) घटना १६ जूनच्या मध्यरात्री घडली.
राहुरी तालुक्यातील आरडगांव परिसरात ती १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईवडिलांच्या सोबत राहते. ती इयत्ता अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दि. १६ जून रोजी मध्यरात्री ३ वाजे दरम्यान तीन आरोपींनी मिळून त्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला) कशाचे तरी आमिष दाखवून मोटरसायकलवर बसवून पळवून नेले. त्या मुलीच्या आईवडिलांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. अखेर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेतली.
त्या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत संशयीत आरोपी म्हणून दत्तात्रय कैलास मोरे, किशोर साळुंखे, शरद सोनवणे तिघे रा. वरखेड, ता. गंगापूर, जिल्हा औरंगाबाद या तिघांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण (abducted) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: An 11-year-old girl was abducted by three men