धरणात बुडून अकोलेच्या माय-लेकींचा करुण अंत
Akole: देवीच्या दर्शनासाठी आलेल्या माय लेकींचा धरणात बुडून (drowning ) मृत्यू झाल्याची घटना.
नाशिक | अकोले : देवीच्या दर्शनासाठी आलेल्या माय लेकींचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी नाशिकमधील चांदवड तालुक्यातील केद्राई देवीच्या दर्शनानंतर धरणाच्या काठाजवळ असताना पाय घसरून पडल्याने सात महिन्याच्या बाळासह आईचाही मृत्यू झाला आहे.
चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील केद्राई देवीच्या नवसपूर्तीसाठी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून माय-लेकी देवीचा नवस फेडायला आल्या होत्या. दर्शन झाल्यानंतर सात महिन्याच्या बाळासह अर्चना नीलेश देवकर धरणाजवळ गेल्या होत्या. यावेळी अर्चना देवकर हिचा पाय घसरून मुलीसोबत धरणात बुडाली. काही वेळानंतर आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी आले. मात्र, तोपर्यंत दोघींचा मृत्यू झाला होता. दर्शनासाठी आलेल्या इतर नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहिती वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांना दिली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र, या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एकीकडे मुलीच्या निमित्ताने ते सगळे देवीच्या दर्शनासाठी चांदवडला आले होते. मात्र, या घटनेत सात महिन्यांच्या बाळासह आईलाही जीव गमवावा लागला आहे.
Web Title: Akole’s My-Lekis met a tragic end by drowning in the dam
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App