Home अकोले अकोले तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

अकोले तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

अवकाळी पावसाचा (Rain) फटका, सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या पावसाने कांदा, हरभरा, गहू, झेंडूच्या फुलांचे नुकसान.

Akole taluka hit by unseasonal rain

अकोले:  अकोले तालुक्यातील इंदोरी परिसरातही काल रविवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. इंदोरी परिसरात काही ठिकाणी गारपीटही झाली.

साधारण संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझिम असणाऱ्या पावसाने साडेचार नंतर चांगला जोर धरला. सुमारे सव्वा पाच वाजेपर्यंत हा पाऊस व वादळी वारा होता. इंदोरी फाटा परिसरात गारपिटही झाली. शेंगदाण्याच्या आकाराच्या गारा या परिसरात पडल्या. सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या पावसाने कांदा, हरभरा, गहू, झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले आहे. आणि अनेक ठिकाणी गह भिजले तर टोमॅटो, शेवंती यांचीही नुकतीच लागवड केलेल्या पिकांचेही यामुळे नुकसान होईल होऊ शकते. काढणीस आलेला कांदा उत्पादकांना तर मोठी परेशानी वाढली असून गारांमुळे हा कांदा काढल्यानंतर टिकणार नसल्याने कांदा उत्पादकांना या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिठीने शेतकरी उध्वस्त झाला आहे. सरकारने पंचनाम्याची घोषणा केली पण अद्याप पंचनामे सुरु नाहीत.

Web Title: Akole taluka hit by unseasonal rain

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here