Home अकोले अकोले तालुक्याला जिल्ह्यातून अँटीजेन कीटच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे चाचणीची बोंबाबोंब, ५५ बाधित

अकोले तालुक्याला जिल्ह्यातून अँटीजेन कीटच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे चाचणीची बोंबाबोंब, ५५ बाधित

Akole Taluka Antigen kit and 55 corona Positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज शासकीय अहवाल प्राप्त झाले नाही तसेच अँटीजेन कीटचा तुटवडा भासल्याने चाचणी सुद्धा कमी घेण्यात आल्या आहेत. खासगी चाचणी व अँटीजेन चाचणी नुसार ५५ नवे रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ६६०९ इतकी झाली आहे.

अकोले तालुक्याला अँटीजेन कीटचा पुरवठा जिल्ह्यातून कमी झाल्याने कोरोना चाचणी घेणे अशक्य झाले आहे. तालुक्यात नागरिकांनी आंदोलन करून सुद्धा दिलेले आश्वासनाची पूर्तता करण्यास प्रशासन असमर्थ आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तालुक्यात ऑक्सिजन, रेमेडेसिवीर, अँटीजेन कीटचा तुटवडा असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.   

रॅपिड अँटीजेन कीट संपलेल्या आहेत. मागणी केलेली असून अद्याप पुरवठा झालेला नाही त्यामुळे लवकरच पूरवठा होईल अशी अपेक्षा आहे. अकोले तालुका आरोग्य अधिकारी

शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोना बाधित गावांची नावे खालीलप्रमाणे:

सुगाव: २

नवलेवाडी: ५

धुमाळवाडी: २

खामुंडी: १

ब्राम्हणवाडा: १

करंडी: १

शिरपुंजे: १

शेंडी: १

पिसेवाडी: २

कोतूळ: ५

बुळेवाडी: २

पिंपळगाव खांड: ४

पाडाळणे: ३

अंभोळ: ३

पांगरी कोतूळ: २

यासरठाव कोहणे: २

लिंगदेव: २   

पिंपळगाव नाकविंदा: ६

देवठाण: १

कळस खुर्द: १

पिंपळगाव निपाणी: १

आंबड: १

मवेशी: १

अकोले: १

गर्दनी: ३

लव्हाळी: १

असे ५५ जण बाधित आढळून आले असून शासकीय अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Akole Taluka Antigen kit and 55 corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here