भंडारदरा परिसरात काजवे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणांची गाडी पलटी एक ठार
अकोले: अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात काजवे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणांची गाडी पलटी होऊन अपघात घडला. शनिवारी पहाटे काजवे पाहून परतत असताना गाडी पलटी होऊन संकेत यशवंत जाधव वय २४ रा. इंदिरानगर ता. संगमनेर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला दत्ता यशवंत शेणकर वय २९ हा तरुण गंभीर जखमी झाला असून इतर दोघांना किरकोळ मार लागलेला आहे.
संगमनेर येथील हे तरुण मारुती स्विफ्ट कार (एम.एच. १२ एच. एल. १८३३) मध्ये भंडारदरा परिसरातील काजवे पाहण्यासाठी आले होते. शनिवारी पाहटे परतत असताना मुतखेल जवळील वळणावर गाडी आली असता कार पलटी होऊन अपघात घडला. यामध्ये संकेत जाधव गाडी चालवत होता व त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दत्ता शेणकर याच्या डोक्याला मार लागल्याने उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले आहे. किरकोळ जखमी झालेल्या पांडुरंग तान्हाजी जाधव (घोडेकर मळा, संगमनेर )यांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर किरकोळ जखमी पांडुरंग जाधव व पांडुरंग दफेडार यांना सोडण्यात आले.
Website Title: Akole One killed in a car accident