अकोले: पंचायत समितीत येणाऱ्या शेतकी योजनांचा लाभ घ्यावा -उपसभापती मेंगाळ.
पंचायत समितीत येणाऱ्या शेतकी योजनांचा लाभ घ्यावा -उपसभापती मेंगाळ.
पाडोशी (वाखारी)येथे गणेश विसर्जन संपन्न.
पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी – मी अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. त्यामुळे गरीबीचे चटके सहन केलेले आहेत. शेतकऱ्यांच्या असणाऱ्या समस्यांची मला जाणीव आहे.राजकारणात सर्वात लहान वयाचा मी प्रतिनिधी आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यास मी तत्पर राहील. म्हणून आपण सर्वांनी तालुका पंचायत समितीत ज्या शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा अशी विनंती अकोले पंचायत समितीचे उपसभापती मारूती मेंगाळ यांनी केली.
You May Also Like: Jacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images
अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील पाडोशी (वाखारी ) येथील सिद्धी विनायक तरूण मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन सोहळया निमित्त उपसभापती मारूती मेंगाळ यांनी प्रमुख अतिथी म्हणून आपले मत प्रतिपादन केले.
याप्रसंगी समशेरपुर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन दराडे, ठाकर समाजाचे उपाध्यक्ष रामदास गावंडे, पप्पु कासार, शत्रुग्न डगळे, पाडोशीचे सरपंच प्रकाश साबळे, मेजर नामदेव सांगडे,मंडळाचे अध्यक्ष पुनाजी साबळे, उपाध्यक्ष सोमा साबळे, कार्याध्यक्ष सुनिल लोखंडे, सचिव सोमनाथ साबळे, खजिनदार अप्पा साबळे, ढवळा साबळे, राजू साबळे, धोंडू साबळे, विठ्ठल साबळे, गणपत भांगरे, विष्णु साबळे, उत्तम साबळे, कुंडलिक साबळे, कैलास भांगरे, कृष्णा साबळे, बाळू नाडेकर, संतोष निकाळे, उत्तम निकाळे, किसन नाडेकर, गोगा साबळे, सचिन नाडेकर, संपत साबळे, संतोष साबळे, मोहन लोखंडे, गणेश साबळे यांसह महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना उपसभापती मेंगाळ यांनी गणेश उत्सवाचे महत्व सांगुन यशाच्या पायऱ्या चढत असताना वाटेत भेटणाऱ्या लोकांशी नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करा. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा ज्यांनी वाईट वेळेत साथ देवून चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. असे प्रतिपादन केले.
सचिन दराडे यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. भेदभाव विसरून नाती जपा. जीवनातील रस्ते कितीही खडतर असले तरी रस्ता बदलून का होईना परंतु चालने सोडू नका असे मत प्रतिपादन केले.
मंडळाचे अध्यक्ष पुनाजी साबळे यांनी चांगल्या ह्रदयाने खुप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात. म्हणून कार्य करणाऱ्यांना नावे ठेवण्यापेक्षा साथ देत रहा हे कार्य अखंड चालत राहील असे मत व्यक्त केले.
गणपतीच्या आरतीचे मानकरी उपसभापती मारूती मेंगाळ हे होते. तर उद्घाटन सचिन दराडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष सुनिल लोखंडे यांनी केले. सुत्रसंचालन सर्वोदय विदयालयाचे प्रा. सचिन लगड यांनी केले. तर ढवळा साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धी विनायक तरूण मित्र मंडळ तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.