अकोले नगरपंचायत निवडणूक बहुरंगी तर महाविकास आघाडी फोल
अकोले | Akole Nagar Panchayat Election: अकोले नगरपंचायत निवडणूक बहुरंगी होणार आहे तर महाविकास आघाडी फोल ठरली आहे.
अकोले नगरपंचायत निवडणुकीत 13 जागांसाठी 44 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात युती झालेली आहे. शिवसेना तीन प्रभागात लढत देत असून इतर प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार लढत आहे. काँग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेस १३ पैकी ६ प्रभागांत निवडणूक लढविणार आहे. भाजप पक्ष प्रभाग 1 चा अपवाद वगळता सर्व जागांवर निवडणूक लढवीत आहेत.
या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न फोल ठरले आहे. काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढा देत आहे.राष्ट्रवादी व शिवसेना यांची युती असली तरी या दोन्हीही पक्षांचे अनेक बंडखोर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे बहुसंख्य प्रभागांत तिरंगी,चौरंगी लढती होणार आहेत.
अकोले नगरपंचायतीच्या 17 प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 4,11,13 व 14 या प्रभागांची निवडणूक न्यायालयीन आदेशामुळे स्थगित झाली आहे, उर्वरित 13 प्रभागांत 60 उमेदवारांचे 89 अर्ज वैध ठरले होते. यात अनेकांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले होते.यातील 16 उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे आता 44 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही याबाबत उत्सुकता होती, मात्र राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षामध्ये जागा वाटपात एकमत न झाल्यामुळे काँग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात येऊ शकली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. शिवसेनेच्या वाट्याला प्रभाग क्रमांक 1, 5 आणि 10 आले असून उर्वरित प्रभागात राष्ट्रवादी निवडणूक लढविणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना या दोन्हीही पक्षांनी आपल्या सर्वच उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. त्यामुळे यातील काही उमेदवारांनी या युतीला केराची टोपली दाखवत आपली उमेदवारी कायम ठेवली. पक्षचिन्ह असल्यामुळे हे उमेदवार त्या त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत.
भाग क्रमांक 1 मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार शोभा मच्छिंद्र मंडलिक यांनी आज पक्षाला अंधारात ठेऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रभाग 1 चा अपवाद वगळता सर्व जागांवर निवडणूक लढवीत आहेत.
मनसेनेही 3 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत अशी माहिती मनसेचे तालुकाप्रमुख दत्ता नवले यांनी दिली.
प्रभाग- 3 मधून जयश्री दत्तात्रय नवले ,
प्रभाग- 5 मधून हर्षल रमेश गुजर व
प्रभाग- 8 मधून योगेश रामनाथ गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत.
Web Title: Akole Nagar Panchayat Election Report