Home अकोले अकोले: दोन ऊस तोडणी कामगारांवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

अकोले: दोन ऊस तोडणी कामगारांवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

Akole Bibatya attack on two sugarcane harvesters

अकोले: अकोले तालुक्यातील वाघापूर शिवारात दोन उस तोडणी मजुरांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात उस तोडणी मजूर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या ऊस तोडणी मजुरांना वनविभागाने भरपाई द्यावी अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले यांच्याकडे केली आहे. 

याबाबत माहिती अशी की, वाघापूर शिवारात शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुळचे मालेगाव भागातील असलेल्या दोन उस तोडणी कामगारांच्या दोन्ही हाताच्या उजव्या बाजूला जखमा केल्या आहेत.

शंकरअप्पा मोतीराम पवार व संजय काळू सोनवणे हे दोघे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार करण्यात आले.

Web Title: Akole Bibatya attack on two sugarcane harvesters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here