मला काय तेवढाच उद्योग नाहीये, पार्थ ट्विटबद्धल अजित पवारांची प्रतिक्रिया
पुणे: पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर अजित पवार यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. हाथरस येथील बलात्कार, राहुल गांधी यांना अटक अशा विषयांवर भाष्य केले. मात्र पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षण संबंधी ट्वीटबद्धल विचारले असे असता त्यांनी मला काय तेवढाच उद्योग नाहीये असा संताप व्यक्त केला.
अजित पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसची ती भूमिका नाही. अलीकडची मुले काय काय ट्वीट करतात प्रत्येक वेळी विचारता तुमच्या मुलाने काय ट्वीट केलं आहे. मला तेवढाच उद्योग नाहीये. राज्यातील विविध प्रकारची जबाबदारी माझ्याकडे आहे. ज्याचे त्याचे स्वतंत्र विचार असतात. प्रत्येकाने काय ट्वीट करायचे हा ज्याला त्याला हक्क आहे अशी आमची भूमिका आहे असेही अजित पवार म्हणाले.
हाथरेप बलात्कार घटनेवर अजित पवार म्हणाले उत्तरप्रदेश मध्ये जे काही घडल ते अत्यंत वाईट होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी असे प्रकार घडता कामा नये. केंद्रसरकारने त्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ajit Pawar Reaction after Parth Pawar tweet