कोरोना काळात कर्तव्यात कसूर म्हणून दोन शिक्षकांना नोटीसा, शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन
अहमदनगर | Ahmednagar: नगर तालुक्यातील दोन शिक्षकांवर कोरोना काळात कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करण्यात आली आहे. तहसील विभागाने कारणे दाखवा नोटीसा बजाविल्या आहेत.
नगर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. प्रशासनाने प्राथमिक शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. गावातील विलगीकरण कक्षात नोंदी ठेवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्र या ठिकाणी शिक्षकांच्या नेमणुका केलेल्या आहेत.
कोरोना या जागतिक संकटाच्या काळात प्राथमिक शिक्षकांकडून मोलाचे योगदान मिळत आहे. या काळात शिक्षक मोलाची भूमिका बजावत आहे.
मात्र ग्रामीण स्तरावर काही लोक कोरोना काळातील नेमणूक दिलेल्या कर्तव्याकडे जाणूनबुजून पाठ फिरवत आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई तालुका प्रशासन करीत आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आठवड येथील जिल्हा परिषद शाळेचे दोन प्राथमिक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला आहे.
दरम्यान कोरोना विरुद्ध लढ्यात प्राथमिक शिक्षकांची फ्रंटलाईन वर्कर म्हणून गणना करावी, सर्वच शिक्षकांचे लसीकरण करावे या मागणीसाठी राहुरी तालुक्यात शिक्षक परिषदेच्या वतीने आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
प्राथमिक शिक्षकांनी नुकतेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सर्वेक्षण घरोघरी जाऊन केले. प्राथमिक शिक्षक हा एकच घटक लसीकरणाशिवाय काम करीत होता. इतर जिल्ह्यात शिक्षकांना प्राधान्याने शिक्षकांना दोन्ही डोस पूर्ण केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन याबाबत का उदासीन आहे. शिक्षकांना लस नाही तर मग काम का दिले जाते असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने एक दिवसाचे आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
Web Title: Ahmednagar Teachers’ hunger strike