अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता, चौंडी येथून रथयात्रा सुरू
Ahmednagar Name Change: नामांतराच्या मागणीसाठी आजपासून चौंडी येथून रथयात्रा सुरू.
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी नामांतराची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर नामांतराच्या मागणीसाठी आजपासून चौंडी येथून रथयात्रा सुरू झाली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते रथयात्रेची सुरुवात झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने रथयात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे. 20 फेब्रुवारीला या रथयात्रेचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचा समारोप होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म गाव असलेल्या चौंडी येथून या रथयात्रेची सुरुवात झाली आहे. तसेच 20 फेब्रुवारी रोजी महामोर्च्याने समारोप होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, पाथर्डी, श्रीरामपूर, राहुरी आणि शेवगाव या सर्व तालुक्यातून ही रथयात्रा जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकापासून या यात्रेला सुरुवात झाली असून या रथयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना सर्वच थोर व्यक्तींनी दिलेली दिशा हा आपला विचार बनलेला आहे. त्यामुळे या थोर व्यक्तींनी दिलेला विचार जपणं ही आपली जबाबदारी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कामं खूप मोठे आहे, त्यामुळे त्यांचे नाव जिल्ह्याला देण्याची मागणी होत असताना त्यांचं मग जिल्ह्याला द्यायला काय हरकत आहे, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. या सगळ्यात कोणी व्यक्तिगत राजकारण करू नये, ही रथयात्रा अतिशय शांततेत जिल्हाभर जाणार आहे. भविष्यात नामांतर समितीला आणि रथयात्रेला कुणी विरोध केला, तर त्यांना आम्ही विरोध करू, असं रोहित पवार म्हणाले.
Web Title: Ahmednagar Rath yatra started from Chaundi to demand a name change
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App