अहमदनगर: धावण्याच्या स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेतून वडिलांवर उपचार करणाऱ्या भगिनीचे यांनी स्वीकारले पालकत्व
अहमदनगर | Parner | पारनेर: धावण्याच्या विविध स्पर्धेत भाग घेत मिळविलेल्या बक्षिसांच्या रकमेतून वडिलांचा उपचार करणाऱ्या पारनेर (Parner) तालुक्यातील अळकुटी (Alkuti) येथील शीतल , साक्षी आणि भाग्यश्री भंडारी यांचे संपूर्ण पालकत्व उद्योजक शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फौंडेशन यांनी स्वीकारले आहे.
तसेच त्यांनी त्यांच्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारीही घेतली आहे. उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Fhirodiya) यांच्यामुळे भंडारी भगिनींच्या जिद्धीला मोठे पाठबळ मिळाले आहे. फिरोदिया यांच्या पाठबळामुळे शीतल, साक्षी, भाग्यश्री या भगिनी आंतराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत.
क्षमता असेल तर जिंकणारच हे ध्यानात घेऊन मुलींनी मेहनत करावी. आता त्यांना कोणताही ताण तणाव राहणार नाही. त्यांच्या वडिलांचा उपचाराचा संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतली आहे. – उद्योजक नरेंद्र फिरोदिया
ओलम्पिकमध्ये नक्कीच सुवर्णपदक मिळवू हेच आमचे ध्येय आहे. धावपटू शीतल, साक्षी, भाग्यश्री
Web Title: Ahmednagar parner Alkuti three girls parentship Narendra Fhirodiya