अहमदनगर: अल्पवयीन मुलीला पळवून नेले
Ahmednagar News: एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याची घटना.
श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीना पळवून नेण्याचे प्रमाण वाढले असताना आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. श्रीरामपूर शहरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सरस्वती कॉलनी परिसरातील ही मुलगी आहे. ती विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेते. १७ डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घरातून कोणालाही न सांगता ती निघून गेली. आजूबाजूला शोध घेऊनही ती मिळून आली नाही. अखेर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.
Web Title: Ahmednagar News minor girl was abducted
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App