करोनाचा संदेश: संगमनेरात पुतळ्याला घातला मास्क
संगमनेर: संगमनेर शहरात करोनाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणू रोखण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. करोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन जनजागृती करत आहे.
त्याचबरोबर एका अज्ञात व्यक्तीने संगमनेर शहरातील अकोले बायपास येथील एका पुतळ्याला मास्क घातला आहे. यामधून लोकांना असा संदेश द्यायचा आहे की, पुतळ्याने मास्क वापरला आहे. तुम्हीही वापरा असा त्या व्यक्तीने संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुतळ्याचा फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल झाला आहे.
अकोले बायपासला तीन ते चार महिन्यापूर्वी संगमनेर नगरपालिकेने रस्ता सुशोभिकारणासाठी एक पुतळा बसविला होता. संगमनेर शहरातील अकोले बायपास रोडवर एका चौकात सूर्यनमस्कार घालताना पुतळा बसविलेला आहे. या पुतळ्याला अज्ञात व्यक्तीने मास्क घातला आहे. याची चर्चा संगमनेरात चांगलीच रंगली आहे. ह्या फोटोसह संदेश सोशियल मेडीयावर व्हायरल झाला आहे. या अज्ञात व्यक्तीने पुतळ्याला मास्क घालून करोना रोखण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे.
Website Title: Ahmednagar news live today Sangamner tachu mask