Home अहिल्यानगर कांताबाई सातारकर पाठोपाठ नातवाचा कोरोनाने मृत्यू

कांताबाई सातारकर पाठोपाठ नातवाचा कोरोनाने मृत्यू

Ahmednagar News Kantabai Satarkar was followed by her grandson Corona

संगमनेर | Ahmednagar News: जेष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे कोरोनाने २५ मे रोजी निधन झाले होते. या धक्क्यातून सावरत नाहीच तो आणखी एक खेडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कांताबाई सातारकर यांचा नातू अभिजित उर्फ बबलू खेडकर यांचेही कोरोनाने निधन झाले आहे. कुटुंबातील तिघा जणाच्या मृत्यूमुळे खेडकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

खेडकर कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालायात उपचार सुरु होते. अनिता उर्फ बेबीताई यांच्यावर संगमनेरमध्ये उपचार सुरु असताना यापूर्वीच निधन झाले होते. नंतर २५ मे रोजी कांताबाई यांचे निधन झाले. तर नातू अभिजित खेडकर यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु असताना निधन झाले आहे. कांताबाई सातारकर, कन्या अनिता आणि नातू बबलू तिघांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Ahmednagar News Kantabai Satarkar was followed by her grandson Corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here