Home अहिल्यानगर वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याने मुलाची आत्महत्या

वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याने मुलाची आत्महत्या

Ahmednagar News Child commits suicide after father removes mobile

श्रीरामपूर | Ahmednagar News: राहता तालुक्यातील रांजणखोल येथे १४ वर्षीय शालेय मुलाकडून त्याच्या वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

निरीक्षक सानप यांनी सांगितले की, नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली असता मुलाला मोबाईल खेळण्याची सवय होती मात्र वडील रागावले व त्याच्याकडून मोबाईल काढून घेतल्याने मुलाने असे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. पुष्कर नरेश लांडगे वय १४ असे या मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

पुष्कर याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याच्या नातेवाईक यांनी श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.  

Web Title: Ahmednagar News Child commits suicide after father removes mobile

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here