Ahmednagar news: पैशाची मागणी केल्याचा राग आल्याने व्यापाऱ्याने महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून मारहाण केल्याची घटना.
कोपरगाव : तालुक्यातील शेतकरी महिलेचे कांद्याचे पैसे आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्याने थकविले. पैशाची मागणी केल्याचा राग आल्याने व्यापाऱ्याने महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून मारहाण केली. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील टाकळी फाटा येथे कांदा व्यापारी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदे व इतर शेती माल विकत घेतात. या ठिकाणी गुरुवारी सकाळी शेतकरी महिला आली होती. तिने व्यापारी मणिकांत श्रीनिवास गेडशेट्टी (रा. गलवणी पालम, आगनमपुरी, आंध्र प्रदेश) त्यास कांद्याचे पैसे मागताच महिलेला मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
Web Title: Ahmednagar Kopargaon Molsted of a woman
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App