अहमदनगर ब्रेकिंग: मनसेच्या जिल्हा अध्यक्षांवर चाकू हल्ला
Ahmadnagar: साकुरी ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान प्राणघातक हल्ला (Knife attack).
राहाता : मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश नामदेव लुटे यांच्यावर साकुरी ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान प्राणघातक हल्ला झाला. साकुरी येथील हॉटेलवर गुरुवार, दि. १५ रोजी रात्री ७:३० च्या सुमारास हा हल्ला झाला. या हल्ल्यात चाकू व लोखंडी मुठीचा वापर करण्यात आला. यामध्ये लुटे गंभीर जखमी झाले असून, शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
राजेंद्र लुटे यांनी राहाता पोलिस ठाण्यात शुक्रवारी याबाबत फिर्याद दाखल केली असून, फिर्यादीत आरोपी हा मला ओरडून तुझी आई सदस्य म्हणून निवडून येते. तू पण मागच्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य होता. आता तुझ्या भावाला उभे केले आहे, तुमची ठेव आहे का? असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी आरोपीने माझ्या डाव्या बाजूने अचानक येऊन त्याच्या हातातील लोखंडी चाकूने माझ्या डोक्यात जोराने मारले व चाकूची मूठ माझ्या डाव्या खांद्यावर जोराने मारली. दरम्यान, माझ्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. जबर मारहाण करून आरोपी पसार झाल्याचे म्हटले आहे.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
Web Title: Ahmednagar Knife attack on district president of MNS
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App