पतीचा पत्नीला पेटवून देण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
अहमदनगर | Ahmednagar: पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिचा खुनाचा प्रयत्न केल्याची घटना भिंगारमधील वडारवाडी येथील आनंद कॉलनीमध्ये घडली आहे.याबाबत पतीविरुद्ध खून करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेश्मा सूर्यवंशी वय २९ हिचे पती संतोष राजाराम सूर्यवंशी यांच्यासोबत वाद झाला होता. त्यामुळे तिने भिंगार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याचाच मनात राग धरून रेश्मा ही घरी आल्यानंतर तु माझ्याविरुद्ध तक्रार का केली, तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून संतोष सूर्यवंशी याने एका बाटलीत आणलेले पेट्रोल रेश्मा हिच्या अंगावर टाकून पेटवून देवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रेश्मा हिच्या फिर्यादीवरून पती संतोष याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Husband tries to set wife on fire